जिल्ह्यात 15 दिवसांत 25 टँकरमध्ये वाढ

0

जळगाव – जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये पाणीटंचाईग्रस्त 41 गावांची भर पडली असून त्याठिकाणी 25 टँकर सुरु करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 201 गावांमध्ये 181 टँकर सुरु आहेत. 55 गावांमध्ये 278 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. 55 गावांमध्ये 52 तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना आहेत.

61 गावांमध्ये 111 नवीन विंधन विहिरीचे काम झाले आहे. 42 गावांमध्ये 58 नवीन कुपनलिका करण्यात आल्या आहेत. 49 गावांमध्ये 49 विहिरींचे खोलीकरण करण्यात आले. 2 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे.  दरम्यान जिल्ह्यात तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, कडक उन्हामुळे जलाशयातील बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून जलसाठा घटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.