जिल्ह्यात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले ; एकही मृत्यू नाही

0

जळगाव ;- जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जळगाव शहर –२७, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- ११, अमळनेर- ०३, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-००, जामनेर-०३,रावेर-०३, पारोळा-०४, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ५९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ०४८ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ३६३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर आतापर्यंत १२८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ३९७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.