जळगाव – जिल्ह्यात २९ व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त आढळल्याने मतदानच सुरु झाले नाही. २९ व्हीव्हीपॅट, २२ बलेट आणि २२ युनिट बदलल्यानंतर मतदान सुरु झाल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना दिली.
दरम्यान क्रेझी मंगल कार्यालयाच्या मागील संतसंग भवन गणपती नगर येथील मतदान केंद्रावर डॉ. ढाकणे यांनी मतदान केले. यावेळी डॉ.ढाकणे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदानाचे करण्याचे आवाहन केले.