Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंध लागू; काय सुरु काय बंद राहणार?
    जळगाव

    जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंध लागू; काय सुरु काय बंद राहणार?

    By March 31, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : मंगळवारी तीन दिवसांचा प्रति लॉकडाऊन निमित्त लावण्यात आलेले विशेष निर्बंध संपुष्टात आले. त्यापाठोपाठ आगामी १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेले नवीन नियम आजपासून अंमलात आले आहेत.

    यात सिनेमागृह, मॉल, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षकगृहे आदी ठिकाणे सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. या काळात रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

    हे राहणार बंद

    सर्व आठवडे बाजार, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बगिचे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, जिम, व्यायामशाळा, खेळांची मैदाने, स्वीमिंग टँक, यात्रा, दिंड्या, उरुस, धार्मिक कार्यक्रम, लॉन्स, मंगल कार्यालये हे सर्व बंद राहणार आहे.

    यांना परवानगी

    जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल, खानावळी, परमिट रूम, बार सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील. होम डिलिव्हरी रात्री १० वाजेपर्यंत देता येईल. या ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट लागू असेल.

    यांना सशर्त परवानगी

    जिल्हाधिकार्‍यांनी काही बाबींना Unlock सशर्त परवानगी दिली आहे. यात भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने, एका आड एक, बाजार समित्या नियम पालन करून खुली राहणार आहे. हॉटेल बार बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने, शिक्षणाची सुविधा ऑनलाइन द्वारे, वाचनालये, अभ्यासिका ५० टक्के क्षमेतेने सुरू राहतील. धार्मिक स्थळे ५ लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत केवळ पूजा-अर्चा करण्यासाठी. अंत्यविधीला २० लोकांनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाला २० लोकांची उपस्थिती, वैधानिक सभांना ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी, निदर्शने, मोर्चे, रॅलींना बंदी मात्र, ५ जणांच्या उपस्थितीत पोलिस परवानगीने निवेदन देता येईल. खासगी आस्थापना, कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

    दरम्यान, शासकीय व निमशासकीय कार्यालये आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थितीबाबत प्रमुखाने निर्णय घ्यायचा आहे. सर्व शासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणार्‍या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय अभ्यंगतांना प्रवेश असणार नाही. ज्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले असेल त्यांना विभागाच्या प्रमुखांच्या पासनेच प्रवेश दिला जाईल.

    नियम तोडल्यास दंड

    जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif