जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. आज दिवसभरात नव्याने ३०५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले . त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७२७५ इतकी झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ५२ , जळगाव ग्रामीण ११, भुसावळ २८, अमळनेर ०४, चोपडा १३, भडगाव ०२, धरणगाव ०७, पाचोरा १३, चोपडा १३,यावल ०३, एरंडोल ०४, जामनेर २१, रावेर १०, पारोळा २२ , चाळीसगाव १६, मुक्ताईनगर ०९, बोदवड ०७, इतर जिल्ह्यातील ०१ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १८३ रुग्ण बरे झाले आहे.

