जळगाव । जिल्ह्यात आज ४७५ रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह अमळनेर आणि रावेर तालुक्यात रूग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. तर आजच्या एकूण बाधितांपेक्षा बरे होवून गेलेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे चित्र पाहण्यास मिळत असल्याने काहीसा दिलासादायक चित्र असल्याचे म्हणावे लागणार आहे.
आज नव्याने ४७५ रूग्णांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४४ हजार ३७२ इतकी झालेली आहे. तर दुसरीकडे आज दिवसभरात ६२५ रूग्णांना कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या ही ३३ हजार ५६६ आहे. अर्थात सध्या स्थितीला जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये ९ हजार ६९२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
18 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमधून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा चिंता वाढविणारा ठरत आहे. आज सोमवारी कोरोनामुळे अठरा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण मृत झालेल्यांची संख्या ही १११४ वर पोहचली आहे. रोजच्या वाढत्या आकड्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१११, जळगाव ग्रामीण-१५; भुसावळ-४३; अमळनेर-४५; चोपडा-३९; पाचोरा-७; भडगाव-४; धरणगाव-२२; यावल-२०; एरंडोल-१०, जामनेर-१८; रावेर-४५; पारोळा-२०; चाळीसगाव-४३; मुक्ताईनगर-२२, बोदवड-७ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ४७५ रूग्ण आढळून आले आहेत.