Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»जिल्ह्यात बनावट ऊंट बीडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड
    महाराष्ट्र

    जिल्ह्यात बनावट ऊंट बीडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     मलकापुर | प्रतिनिधी 
    राज्यात प्रचलीत ऊंट बीडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली  होती..तर आज या कारवाईतील इतर आरोपींसह मुख्य आरोपीस मलकापूर शहर पोलीसांनी गोंदिया येथुन अंदाजे दिड लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
    मध्यप्रदेशातील बुऱ्हानपुर येथुन बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्री केल्या जात असुन या मुळे शासनाला टैक्स भरून हा व्यवसाय करणाऱ्या बीडी कंपनीला आर्थीक नुकसान होत होते .  मलकापूर येथे बनावट ऊंट बिडी विकल्या जात असल्याची माहिती या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला मिळाली होती.या बाबतची शाहनिशा केल्या नंतर ऊंट बीडीचे सर्वेअर अमोल कुलकर्णी यांनी तक्रार मलकापुर शहर पोलसात दिल्याने पोलिसाने या तक्रारीवरून  12 मार्च रोजी मलकापुर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर धाड टाकून दुकानातून ऊंट बीडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला होता . यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याचे विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 102 , 103,104 तसेच कॉपीराईट एक्ट 1957 चे कलम 51 व 63 आणि भादवीच्या कलम 420 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती.पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास केला असता बुरहानपुर येथील दिनेश हुंदराज शतवानी यांनी मलकापूर येथील रामचंद्र ट्रेडर्स यांना बनावट बिडी विक्री केल्याचे समजले मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या दबंग महिला एपीआय स्मिता म्हसाये व त्यांची टीम तात्काळ बुऱ्हाणपूरला रवाना होत बुऱ्हाणपूर येथे पोहोचून दिनेश हुंदराज शतवानी याला ताब्यात घेत सदर आरोपीला मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यालासुद्धा पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता बऱ्हानपुर येथीलच भजनलाल जयरामदास भोजवानी हा देखील सदर आरोपींना बनावट बिडी विक्री करण्याचे उघडकीस आले पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथून भजनलाल जय रामदास भोजवानी व मिनी फॅक्टरी चालवणाऱ्या रोशन खान हुसेन खान याला सुद्धा अटक केली व त्याला देखील पाच दिवसांचा पीसीआर देण्यात आला त्यांनी दिलेल्या कबुली वरून गोंदिया येथील मुख्य आरोपी इम्रान युनुस पोथीयावाला हा गोंदिया येथे मोठ्या प्रमाणात बनावट उंट बिडी तयार करत होता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून बनावट बिडी तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली सदर कारवाई मध्ये एक लाख 27 हजार 89 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा तपास अरविंद चावरीया जिल्हा पोलीस अधीक्षक, हेमराजसिंह राजपुत अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, दिलदार तडवी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर, प्रल्हाद काटकर शहर पोलीस निरीक्षक मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये सोबत पोकॉ .मंगेश चरखे , पोकॉ.प्रमोद राठोड यांचे पथकाने एका आठवडयाच्या आत नकली उंट बीडी बनविणाऱ्या आरोपींची साखळी तोडुन १५ दिवसांत संपुर्ण तपास यशस्वीपणे पूर्ण केला .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif