जिल्ह्यात पाच ठिकाणी सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरू

0

जळगाव : महाराष्ट्र राज्य को.-ऑपरेटिव्ह ग्रोवर्स मार्केटिंग फेडरेशनतर्फे येत्या सोमवारपासून (27 एप्रिल) जिल्ह्यात पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

“कोरोना’ संसर्गाच्या “लॉकडाउन’ अगोदरही फेडरेशनतर्फे धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल, अमळनेर, मालेगाव या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, “लॉकडाउन’मुळे ती बंद करण्यात आली. नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रे सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून (27 एप्रिल) धरणगाव, पारोळा, कासोदा, दळवेल, अमळनेर या ठिकाणी केंद्रे सुरू होतील. सर्वच ठिकाणी दररोज 25 ते 30 गाड्या कापूस खरेदी केला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे त्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहावे, याबाबतचा “मेसेज’ पाठविला आहे. ज्यांनी ऑफलाइन कपाशीची नोंदणी केली आहे त्यांनाही मेसेज पाठविला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.