जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. जळगाव जिल्हयात ही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात ४६ कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
जळगाव शहरात १५, भुसावळ १५, अमळनेर २, धरणगाव १, एरंडोल ३, रावेर १, चाळीसगाव ३ असे एकूण ४६ रुग्ण आढळले आहेत.
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. तर महाराष्ट्रात देखील या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या १२२ आहे. तर कोरोना विषाणूवर एकाने मत केलीय. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.