जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव,शहादा येथे घरफोडी, चोरी करुन मौजमजा करणार्या दोघांना सापळा रचून मोठ्या शिताफीने एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
चोपडा शहरात काही तरुण घरफोडी व चोरी करुन पैशांची मौजमजा करत असल्याची माहिती एलसीबीचे पो.नि. बापू रोहोम यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी पोहेकॉ. शरीफ काझी, युनुस शेख, सुरज पाटील यांना आरोपींची माहिती काढण्याच्या सूचना दिल्या, त्यानूसार पथकाने चोपडा शहर ग्रामीण हद्दीत सत्रासेन, वैजापूर, गवर्यापाडा या जंगल परिसरात त्यांची माहिती काढली. त्यावरुन पोहेकॉ. शरीफ काझी, युनुस शेख, सुरज पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, विकास वाघ बापु पाटील योगेश वराडे, गफुर तडवी, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, इद्रीस पठाण यांच्या पथकाने संशयित सुनिल अमरसिंग बारेला (21) रा. गौर्या पाडा, ता. चोपडा, कालुसिंग शिवराम बारेला (19) रा. चहार्डी ता. चोपडा दोघांना चोपडा शहरातील बर्हाणपूर- अंकलेश्वर रोडवरील सातपुडा हॉटेलच्या बाजुला पानटपरीवर आले असता त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता भुसावळ, जळगाव नंदुरबार शहादा येथून 4 मोबाईल,4 लॅपटॉप, 16 ग्रॅम सोने आदींसह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेतला. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दोघांना पुढील तपासासाठी भुसावळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.