जिल्ह्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णाची होतेय घट ; आज ४४३ रूग्ण आढळले

0

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गात गेल्या काही दिवसांपासून प्राप्त होणारे आकडे थोडा दिलासा देणारे आहेत. सहा ते सात दिवसांत बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णही घटले आहेत. जिल्ह्यात आज ४४३ रूग्ण कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे आजच ७८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये जळगाव शहरात ११४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीणी- ६, भुसावळ-५३; अमळनेर-४१; चोपडा-४३; पाचोरा-१४; भडगाव-१०; धरणगाव-७; यावल-२५; एरंडोल-१२; जामनेर-१९; रावेर-३३; पारोळा-११; चाळीसगाव-३८; मुक्ताईनगर-४; बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यांमधील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज ७८३ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३५,९६१ इतकी झाली आहे. तर आज ८ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११३७ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८७७४ इतके आहेत.

ॲक्टिव्ह रुग्णांत घट 

एकीकडे नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये होणारी वाढ अथवा हे दोन्ही आकडे जवळपास बरोबरीत राहत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांमध्येही बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच सप्टेंबरचा विचार केला, तर दुसऱ्या पंधरवड्यात ॲक्टिव्ह रुग्ण सातत्याने कमी होत आहे. याच महिन्यात १३ तारखेला सर्वाधिक म्हणजे १० हजार ११६ ॲक्टिव्ह रुग्ण होते, नंतर ते थोडे कमी होऊन पुन्हा १७ सप्टेंबरला १० हजार १११ ॲक्टिव्ह रुग्ण होते. तीच संख्या गेल्या सहा-सात दिवसांत सातत्याने घटून २४ सप्टेंबरला ८  हजार ७४४ वर आली आहे. म्हणजे या आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्ण हजाराने कमी झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.