जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराची तिव्रता वाढत आहे. आज जिल्ह्यात १ हजार १३९ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहे. तर गेल्या २४ तासांत १४ जणांचा बळी गेला.
दरम्यान, जिल्ह्यात आज ९९६ रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळ बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ५९० वर गेली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८९ हजार ०१८ झाली आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ८०३ रुग्ण उपचार घेत आहे. तर आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १६२५ वर गेला आहे.
आजचे रुग्ण
जळगाव शहर २८३, जळगाव तालुका १७; भुसावळ ३३, अमळनेर ९३; चोपडा २७७; पाचोरा ३५; भडगाव २०; धरणगाव ५४; यावल १३; एरंडोल ४९, जामनेर ३३; रावेर २१, पारोळा १८; चाळीसगाव ९७; मुक्ताईनगर ११; बोदवड १७ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे ११३९ रूग्ण आढळून आले आहेत.

