जळगाव (प्रतिनिधी) । जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने ओसरतोय. रुग्णांचा आलेख खाली येत असून दररोज नवे बाधित कमी, बरे होणारे अधिक अशी सातत्यपूर्ण नोंद आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालात ५३ नवे रुग्ण आढळून आले, तर १३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल प्रमाणे आजही चार तालुके निरंक असल्याचे अहवालात दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकूण ५३ हजार १४९ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५० हजार ९९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. उर्वरित ८९३ रुग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा १ हजार २६५ वर पोहोचली आहे तर रिकव्हरी रेट ९५.९४ टक्के इतका झालेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज देण्यात आला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -१६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ-४, अमळनेर-८, चोपडा -२, पाचोरा-०, भडगाव -४ धरणगाव -०, यावल-४, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-०, पारोळा -४, चाळीसगाव -४, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ असे एकूण ५३ कोरोना बाधित आढळून आलेत.