जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय ; आज ९९६ नवे रुग्ण, पहा तुमच्या शहरातील आकडा

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात आज ९९६ नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी सर्वधिक २१७ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. दरम्यान, आज ५३२ जण बरे होवून घरी गेले आहे.

आज ९९६ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात बाधिताचा एकूण आकडा ७३ हजार ५७१ वर गेला आले. त्यापैकी ६३ हजार ५५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ८ हजार ५५० बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज सात रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृताच आकडा हा १४६२ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

आज जळगाव शहर- २१७, जळगाव ग्रामीण- ०३, भुसावळ-४२, अमळनेर-९१, चोपडा-१८१, पाचोरा-६५, भडगाव-१९, धरणगाव-७८, यावल-४०, एरंडोल-५५, जामनेर-६०, रावेर-२१, पारोळा-२८, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण ९९७ रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.