जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; आज ९९२ नवे रुग्ण

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा तांडव सुरूच आहे. जिल्ह्यात आज ९९२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच  ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आता एकुण ७१ हजार ६१९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ८५२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज ५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १४४९ इतका आहे.

असे आढळले रुग्ण

आज जळगाव शहर- ४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ-७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-०८, धरणगाव-५०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-०५, रावेर-२५, पारोळा-१५, चाळीसगाव-९८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातून १२ असे एकुण ९९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.