जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ३०० हुन अधिक रुग्ण आढळून येत आहे. आजही दिवसभरात नव्याने 304 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात सर्वाधिक 107 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 7796 इतकी झाली आहे.

आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 107, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 19, अमळनेर 10, चोपडा 16, पाचोरा 21, भडगाव 5, धरणगाव 18, यावल 6, एरंडोल 4, जामनेर 21, रावेर 29, पारोळा 5, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 09, बोदवड 4 अशी रूग्ण संख्या आहे.
दरम्यान, कोरोनामुळे दिवसभरात 10 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर पाचोरा, अमळनेर, भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज जिल्ह्यात एकूण 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

