जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ११८३ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच  आहे. जिल्‍ह्‍यात साधारण महिनाभरापासून संसर्ग वाढताच आहे. सातत्‍याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्‍हाच आता हॉटस्‍पॉट बनला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ११८३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा १३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८१ हजार ९६९ झाली आहे. त्यात एकूण ६९ हजार ९७६ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्‍थितीत १० हजार ४५४ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज पुन्हा जिल्ह्यात १3 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २७४, जळगाव तालुका-१२, भुसावळ १४३, अमळनेर-८८; चोपडा-१९५; पाचोरा-१५; भडगाव-१०; धरणगाव-६७; यावल-३२; एरंडोल-१२२; जामनेर-४१; रावेर ३६; पारोळा-४८; चाळीसगाव-२८; मुक्ताईनगर-४७; बोदवड-२१ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे ११८३ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.