जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; आज १०९० नवे रूग्ण; तर ११ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव :  जिल्ह्यात आज कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात तब्बल १०९० नवे  रूग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात ४४४ बाधित आढळून आले आहेत. तर आज ११ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज १०९० रुग्ण  आढळून आले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७८ हजार ४७० वर गेली आहे. तर आजच ९०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ०९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ११ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृताच एकूण आकडा १५०१ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ४४४, जळगाव तालुका-३६; भुसावळ ११९, अमळनेर-५०; चोपडा-७६; पाचोरा-२६; भडगाव-१४; धरणगाव-६१; यावल-१७; एरंडोल-४०; जामनेर-६९; पारोळा-१७; चाळीसगाव-५६; मुक्ताईनगर-४२; बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.