जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ६०५ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज दिवभरात ६०५ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आज ३०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. चिंतेचा विषय असा की, आज पुन्हा ०५ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

आजच्या कोरोना रिपोर्टनुसार आजवर जिल्ह्यात एकुण ६५ हजार ७४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९  हजार १३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार १८९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.  आज ०५  रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा १४१५ वर गेला आहे.

असे आढळले रूग्ण

जळगाव शहर-205, जळगाव ग्रामीण- 06 भुसावळ 53, अमळनेर-17, चोपडा-45, पाचोरा-00, भडगाव-17, धरणगाव-52, यावल-14 एरंडोल-30, जामनेर-18, रावेर-07, पारोळा-28, चाळीसगाव-89, मुक्ताईनगर-24, बोदवड-01, आणि इतर जिल्ह्यातील8 असे एकुण 605 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.