जिल्ह्यात एका दिवसात आढळले विक्रमी रूग्ण ; पाहा धडकी भरवणारी आकडेवारी

0

जळगाव (प्रतिनीधी) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. आज दिवसभरात धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.आज दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी ११८५ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ३२८ रूग्ण हे हॉट स्फॉट ठरलेल्या जळगाव शहरातील असून शहरातील एकूण संख्या ७ हजर ६०१ वर पोहचली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ हजार ६१८ वर पोचली.

असे आढळले रुग्ण जळगाव ग्रामीण ८३, भुसावळ ५५, अमळनेर ८२, चोपडा ६२, पाचोरा ६५, भडगाव ३८, धरणगाव ३८, यावल १०६, एरंडोल २९, जामनेर २६, रावेर १७, पारोळा ७१, चाळीसगाव ९५, मुक्ताईनगर ७१, बोदवड १३ आणि अन्य जिल्ह्यातील १७.

तर दिवसभरात ५१७ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही २३ हजार ३४३ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब अशी की, रूग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही कमी होत असल्याने ती दिलासादायक बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.