जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना वाढीचा प्रभाव मंदावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी आढळून येत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३२ नवे रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. तर ३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. जिल्ह्यातील १० तालुक्यामध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाहीय.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर – १७, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-६, अमळनेर-०२, चोपडा-१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०४, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार ८१० पर्यंत पोहचली त्यापैकी ५२ हजार १३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता ३९५ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.