जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज दिवभरात २०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी ६८ रुग्ण जळगाव शहरातून आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ८००४ वर गेला आहे. तर दिवसभरात ०९ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ६८, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ १०, अमळनेर ३४, यावल ०३, पाचोरा ०८, भडगाव ०६, धरणगाव ०३, एरंडोल ०८, जामनेर २३, रावेर ०१, पारोळा २८, चाळीसगाव ११, मुक्ताईनगर ०१ असे रुग्ण आढळून आले.
२५५ रुग्ण बरे
दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात तब्बल २५५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला.

