जळगाव । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतोय. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. आज जिल्ह्यात ११९० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरात २९९ सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येसह मृताच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. मागील गेल्या २४ तासात जिल्ह्यात ११९० रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९८ हजार २८९ इतकी झाली आहे. तर आज ११४२ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ८१३ वर गेली आहे. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७४१ वर गेला आहे. जिल्ह्यात ११ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहे.
जळगाव शहर २९९, जळगाव तालुका १३, भुसावळ ९६, अमळनेर १००; चोपडा १६८; पाचोरा ३७; भडगाव ३१; धरणगाव ४३; यावल ३२; एरंडोल १२, जामनेर ४१; रावेर ६८, पारोळा ६५; चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ७६; बोदवड ४१ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे ११९० रूग्ण आढळून आले आहेत.