जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात नव्या बाधितांची रोजची संख्या थोड्या कमी येत आहे. विशेष म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १०४८ नवीन रुग्ण आढळून आले आहे.त्यात जळगाव शहर, भुसावळ, एरंडोल येथे कोरोनाची आकडेवारी १०० च्या वर येत आहे. तर जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १७ हजार ९१६ झाली. दिवसभरात १ हजार १५ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ४ हजार ९०६ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २१ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा २ हजार ९९ झाला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर- १५९, जळगाव ग्रामीण- ५३, भुसावळ-१५७, अमळनेर-७१, चोपडा- ७२, पाचोरा- ५७, भडगाव-१८, धरणगाव- ४२, यावल- ३३, एरंडोल- ११३, जामनेर- ३७, रावेर- ७४, पारोळा- २८, चाळीसगाव- ६६, मुक्ताईनगर- ३७, बोदवड-१५ आणि इतर जिल्हे १६ असे एकुण १०४८ बाधित रूग्ण आढळले आहे.