जळगाव : जिल्ह्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले. मे महिन्यात होणाऱ्या बदल्यांमध्ये ३० मे रोजी ६६ लिपिक, २२ मंडळ अधिकारी, ५८ अव्वल कारकून यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर एका पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ३१ मे रोजी जिल्ह्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
बदली झालेले नायब तहसीलदार (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
अधिकार पेंढारकर, चोपडा (उप विभागीय कार्यालय, चाळीसगाव), कल्पना पाटील, निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय), एन.झेड. वंजारी, संगायो पारोळा (महसूल शाखा, पारोळा), एस.वाय. साळुंखे, संगायो (उपविभागीय कार्यालय, फैजपूर), जी.ई. भालेराव, चाळीसगाव (भडगाव), एस.एस. भावसार, चाळीसगाव (एरंडोल), आर.एस. जोशी, अमळनेर (एरंडोल), डी.एम. वाडीले, अमळनेर (धरणगाव), बी.डी. वाडिले, बोदवड (भुसावळ), एस.एस. निकम, संगायो भुसावळ (निवडणूक शाखा, भुसावळ), सी.बी. देवराज, एरंडोल (जळगाव), सी.जी. पवार, जळगाव (रावेर), आर.आर. ढोले, अमळनेर (चाळीसगाव), मुकेश हिवाळे, भडगाव (पाचोरा).