जिल्ह्यातील रुग्ण संख्येत मोठी घट ; आज ३५७ नवे रुग्ण

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आहे सुधारू लागली आहे. दरम्यान कोरोना च्या बाबतीत आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. मागील दोन अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कमी रुग्ण आले आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३५७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ६७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर गेल्या २४ तासात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता १,३७,१३६ वर पोहचला असून त्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील जास्त आहे. आज जिल्ह्यात ६७५ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण आकडा १,२५,५५३ वर गेला आहे. आज १० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २४६० वर गेला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-४७, अमळनेर-१५, चोपडा-४७, पाचोरा-४, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-०, जामनेर-१३, रावेर-२०, पारोळा-९, चाळीसगाव-३९, मुक्ताईनगर-४०, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.