जिल्ह्यातील बधितांचा आकडा ३७ हजार पार ; आज ८६७ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव (प्रतिनीधी) : जिल्ह्यात आज दिवसभरात ८६७ रूग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक २५५ रूग्ण हे एरंडोल तालुक्यात आढळून आले आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३७ हजार ३०७ वर पोचली.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ८४, जळगाव ग्रामीण ४४, भुसावळ ७६, अमळनेर ५३, चोपडा ७२, पाचोरा ३३, भडगाव ३६, धरणगाव २४ , यावल २१, जामनेर १६, रावेर ३७, पारोळा ३३, चाळीसगाव ४७, मुक्ताईनगर १७, बोदवड १९ व इतर जिल्ह्यातील १०.

तर दिवसभरात ५४१ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही २६ हजार ३८७ झाली. गेल्या २४ तासांत १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ९४६ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.