जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजणार

0

जळगाव :– जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून टंचाईबाबत जि.प.च्या पदाधिकाऱ्यांकडून कुठलेही गांभीर्य घेतले जात नसून साधा आढावादेखील घेतला जात नाही. त्यातच जलव्यवस्थापन समितीच्या सभेलादेखील पदाधिकारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे आज होणारी जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे आहेत.

जि.प.ची सर्वसाधारण सभा आज दि.२१ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. मात्र या सभेत अध्यक्ष उज्ज्वला पाटील व उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन यांची अनुपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांसोबतच शिक्षण सभापतीदेखील अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या सभेत टंचाईवरून घमासान होण्याचे चित्र आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न जिल्हाभरात भेडसावत असतांना जि.प.कडून याचा आढावा घेण्यात आला नाही. पदाधिकाऱ्यांना टंचाईचे गांभीर्य नसल्याने विरोधकांकडून टंचाईचा मुद्दा पेटविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हाभरात साधारणत: २०० टॅंकर्सव्दारे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरविले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.