जिल्ह्यातील पहिली कोरोना विषाणू संसर्ग मार्गदर्शन कार्यशाळा

0

चाळीसगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी प्रा. आ. केद्र  वाघळी येथे जी.प. सदस्य श्री पोपट तात्या भोळे यांच्या मार्गदर्शनाने व  डॉ. देवराम लांडे यांच्या प्रयत्नातून वाघळी येथे कोरोना विषाणू संसर्ग या विषयावर जन जाग्रुती  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  होते . या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच विकास चौधरी होते. प्रमुख उपस्थिती जामडीचे उपसरपंच संजय पाटील, डॉ.भुषण राजपूत ,श्रीमती लता बाळकृष्ण मुलमुले मँडम, श्रीमती राजेश्वरी कदम मँडम, तसेच वाघळी गणातील सर्व शाळा, विद्यालय, अंगणवाडी शिक्षक, शिक्षिका केंद्र प्रमुख , आंगणवाडी सेविका व मदतनीस आशा स्वंयसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्य शाळेत डॉ. भुषण राजपूत आणि विजय पगारे, यांनी मार्गदर्शन केले ह्या आजाराला  घाबरून न जाता ,काळजी घेतल्यास हा आजार आपल्या परीसरात होणार नाही, असे सरपंच विकास चौधरी यांनी सांगितले. ह्या आजारात जनजागृती ची जास्त गरज असल्याचे सांगितले.यावेळी  कदम मँडम यांनी सांगितले आजच आम्ही विद्यार्थ्यांना रुमाल पासून  घरगुती मॉस कसे बनवायचे प्रशिक्षण दिले असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत कुलकर्णी यांनी केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जे. आर. गायकवाड, राजु सोनार, विजय दाभाडे, धोडू पवार, चंद्रकांत सोनवणे, भुषण देवकर, यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.