जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांची कोल्हापूर ,अमरावती कारागृहात रवानगी

0

जळगाव :-यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. याबाबतची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (वय-४१ रा. अट्रावल ता. यावल) आणि भिकन रमेश कोळी (वय-३५ रा. उत्राण ता. एरंडोल) असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे. जिल्ह्यात हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, विनापरवाना वाळू वाहतूक करणारे आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींवर एमपीडीए कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील गुन्हेगार भिकन रमेश कोळी या दोघांविरोधात स्थानबद्ध करण्याचे कारवाईचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याच्या वतीने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात देण्यात आला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोघांवर स्थानबध्दतेच्या कारवाईला मंजुरी दिली आहे. यात गुन्हेगार दिवाकर उर्फ पिंटू टोपलु तायडे याला कोल्हापूर येथील कारागृहात तर दुसरा गुन्हेगार भिकन रमेश कोळी याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुरूवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता काढले आहे. प्रस्तावासाठी कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ आदी तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.