जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसून ती दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये तब्बल ९११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधीक २४० रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ६६० वर गेली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-४१; भुसावळ-५४; चोपडा ८२, पाचोरा-४४; भडगाव-१०; धरणगाव-०८; यावल-१३; एरंडोल-६९; जामनेर-६४; रावेर-५४; पारोळा-४३; चाळीसगाव-६५; मुक्ताईनगर-०५; बोदवड-१० व बाहेरच्या जिल्ह्यातील ९ रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज ५१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्या रूग्णांचा आकडा २२ हजार ३६३ वर गेला आहे. तर आज दिवसभरात ०८ मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या८५७ इतकी झाली आहे.