बोदवड, अमळनेर, पारोळा, यावल, जामनेर, धरणगाव,पाचोरा आडत असो.चा जळगाव कृउबा व्यापार्यांना पाठिंबा
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत विकासकाने पाडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील आडत व्यापार्यांनी बंद पुकारला आहे . त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील विविध बाजार समितीच्या आडत व्यापार्यांनी आपली दुकाने आणि लिलाव उद्या 25 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वानी आपला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे बंद आंदोलनाची धग वाढली आहे. त्यामुळे आणखी पुढे काय होते याकडे व्यापारी आणि शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.
जळगाव येथील बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याच्या निषेधार्थ आडत व्यापाऱयांनी बंद पुकारला आहे . त्याच्या समर्थनार्थ पाचोरा मार्केट आडत असोशिएशनने उद्या 25 रोजी बंद पुकारला आहे. यासाठी एकदिवस लिलावाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सचिवांना याबाबत सूचना देणारे पत्र पाचोरा मार्केट आडत असोशिएशनने दिले आहे.तसेच धरणगाव व्यापारी आडत असोसिएशनने सभापतींना दिलेल्या पत्रात लिलाव एक दिवस बंद राहणार असल्याचे कळविले आहे. चोपडा येथील व्यापाऱयांनी बाजार समितीला पत्र देऊन एकदिवसीय बंदचे आवाहन केले आहे . निवेदनावर मगनलाल अग्रवाल , ताराचंद अग्रवाल आदींच्या स्वाक्षर्या आहे. पारोळा बाजार समिती व्यापाऱयांनी सभापतींना दिलेल्या निवेदनात 25 रोजी एकदिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे . निवेदनावर संदेश वाणी , नामदेव वाणी ,मनोज लुणावत , आदींच्या स्वाक्षर्या आहेत . यावल बाजार समितीच्या आडत व्यापार्यांनी जळगावच्या व्यापाऱयांना पाठिंबा दिला असून एकदिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामनेर बाजार समितीच्या व्यापार्यांनी 25 रोजी मालाची खरेदी विक्री होणार नसून एकदिवसीय बंद ठेऊन पाठिंबा देण्यात आल्याचे म्हटले आहे.