जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडकेंचा पालकमंत्र्यांचा हस्ते सन्मान

0

जळगाव | प्रतिनिधी 

जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमांशी उत्कृष्टपणे समन्वय ठेवून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली आहे.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जळगाव शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या काळात मतदार नोंदणी व मतदार जनजागृती मोहिमेतही सक्रीय सहभाग घेतला आहे.  जळगाव जिल्ह्याचा संदर्भग्रंथ म्हणून महत्वपूर्ण ठरलेल्या जळगाव जिल्हा कॉफीटेबल बुकच्या निर्मिती व संपादनाचे महत्वपूर्ण कामही पार पाडले आहे. जलयुक्त शिवार अभियान व जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात झालेल्या कामांवर आधारित माहितीपट निर्मितीसाठीही श्री. बोडके यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.  त्याचबरोबर शासनाच्या महाअवयदान, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना, शेतकरी कर्जमाफी, पल्स पोलिओ, गोवर व रुबेला लसीकरणाचीही उत्कृष्टपणे प्रसिध्दी केली आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.