Sunday, May 29, 2022

जिल्हा बँक निवडणूकीवर भाजपचा बहिष्कार- माजी मंत्री आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नवनवीन घडामोडी घडत होत्या. तर आज जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व २४ उमेदवार माघार घेतली आहे.

- Advertisement -

थेट लाईव्ह👇

भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी बहिष्काराची घोषणा केली आहे.  याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी आ. गिरीश महाजन म्हणाले की,  ऐन वेळेवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी युटर्न घेतल्याने कमी वेळात आम्ही अर्ज भरले. अधिकाऱ्यांवर दडपण आणल्याने आमचे अर्ज येथे राहू शकले नाही. यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला म्हणून भाजपच्या उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेवून बहिष्कार टाकला आहे. भविष्यात या बँकेचे दूध का दूध, पाणी का पाणी होईल.

तसेच आ. राजूमामा भोळे म्हणाले की , महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत. या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते. आताच्या निवडणुकीसाठीती अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो. जागा वाटपापर्यंत सर्व चर्चा झाली होती.  मात्र ऐनवेळी भाजपचा अन्य पक्षांनी विश्वासघात केला आणि निवडणुकीला भाग पाडले गेले. आमची पहिल्या दिवसापासून सहकार्याचीच भूमिका होती. मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकीच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. खरे तर हे विश्वासघाती आणि सत्तेच्या लालसेने राजकारण होते.

जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणारे सत्तेसाठीच असे बदलले. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उदयॊग आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. ही सगळी त्यांची सुरुवातीपासून स्वतःच्या विकासाची खेळी आहे. शेतकऱ्यांना नुसते ‘बनवले’ गेले आहे. त्यासाठीच या निवडणुकीतसुद्धा त्यांना जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम हवे होते. जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणाऱ्यांनी जिल्हा बँकेकडून किती शेतकऱ्यांचा व अन्य उद्योगांचा विकास आतापर्यंत केला ? , या प्रश्नाचे उत्तर त्यांना जनतेपुढे द्यावेच लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या