Sunday, May 29, 2022

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता प्राप्त केली आहे.

- Advertisement -

21 जागांपैकी यापूर्वीच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला 11 उमेदवार बिनविरोध आले होते. १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.  भुसावळ विकासो मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवली होती, परंतु संजय सावकारे हे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जातात. संजय सावकारे यांना 26 पैकी 22 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शांताराम धनगर यांना ४ मते मिळाली.  शांताराम धनगर हे सुद्धा अपक्ष उमेदवार होते. परंतु त्यांना सहकार पॅनलने  पुरस्कृती दिली होती.

रावेर विकासो मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण पाटील यांना सहकारचे उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठिंबा दिला होता,  याच बरोबर काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राजू रघुनाथ पाटील यांनी पाठिंबा दिला होता. तथापि अरुण पाटलांचा ऐनवेळी गेम झाला. रंजनाबाई पाटील या एक मताने विजयी झाल्या.  माजी आमदार अरुण पाटील यांच्या पराभवाने  नाचक्की झाली.

बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे या महिला राखीव मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाल्या, अनुसूचित जाती जमातीमधून शामकांत बळीराम सोनवणे विजयी झाले, ओबीसीमधून पारोळ्याचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले, गुलाबराव देवकर सुद्धा विजयी झाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या