अमळनेर – अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिष्टान्न जेवण दिल्याने विद्यार्थ्यांनच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.
जि.प.शाळा-मुंगसे ता. अमळनेर येथिल शाळेतील सर्व मुलामुलींना फोडणीचे वरण, भात, शेकलेली बट्टी, बुंदी, वांग्याची घोटलेली भाजी असे जेवण दिले गेले. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक जगदिश चौधरी उपशिक्षक अशोक इसे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणाविस्ताराधिकारी पी.डी.धनगर,बी.पी.चौधरी ,शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.