Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हा परिषद जळगाव सदस्य संघटना अध्यक्षपदी काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे यांची नियुक्त
    जळगाव

    जिल्हा परिषद जळगाव सदस्य संघटना अध्यक्षपदी काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे यांची नियुक्त

    By April 20, 2021Updated:April 20, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल (प्रतिनिधी) जिल्ह्यात मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जळगांव जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील काँग्रेसचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांची निवड कैलास गोरे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस यांनी लेखी पत्राद्वारे नियुक्ती केली.

    याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल,राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांचेकडील नियुक्ती पत्र प्रभाकरअप्पा नारायण सोनवणे यांना प्राप्त झाले आहे.

    जिल्हा परिषद सदस्य व खेडयापाडयातील व अतिदुर्गम भागातील नागरीकांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असुन त्याची जाणीव ठेवुन जि.प.सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे.

    शासनाकडुन येणाऱ्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होवून कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकिय कामांत दैनंदीन येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हा परिषद संघटनेकडुन प्रश्न सोडविले जाणार आहे.

    जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन अध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे(रा.वढोदे प्र.ता.यावल) जि.प.गट न्हावी -बामणोद,यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ.शिरीषदादा चौधरी(महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी),उल्हास पाटील.(प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष)संदीप भैय्या पाटील,(कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष जळगांव)भगतसिंग पाटील(जिल्हा अध्यक्ष इंटक),माजी आ.रमेशदादा चौधरी,हाजी शब्बीर शेठ ( जिल्हा उपाध्यक्ष . कॉग्रेस),वसंत रामजी महाजन (माजी प्रतोद कॉग्रेस),जि.प. सदस्य सौ.सुरेखा ताई पाटील,लिलाधर शेठ चौधरी माजी सभापती,पं.स.सदस्य यावल, शिवरामशेठ तायडे(कॉगेस जेष्ठ नेते बामणोद).,पं.स.गटनेते शेखर पाटील,  कोरपावली माजी सरपंच .जलील पटेल.

    पं.स.सदस्य सर्फराज तडवी, सौ.कालिमा तडवी,कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल न.पा.गटनेता युनुस शेठ, फैजपुर गट नेता न.पा.कलीम मन्यार, यावल शहर अध्यक्ष कदिर खान, माजी सभापती तथा उपसभापती उमाकांत रामराव पाटील,फैजपुर शहर काँग्रेस अध्यक्ष रियाज भाई यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

    जिल्हा परिषद सदस्य-

    असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी माझ्यावर जी जबाबदारी संघटनेने सोपवली असून ती जबाबदारी पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे,सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आले असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेवुनआवाज उठवून निश्चीत प्रयत्न करू आणि या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना नगरसेवक संजूभाऊ वाडे यांच्यासह | सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif