जिल्हा परिषद जळगाव तर्फे जगतराव दौलतराव पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

0

अमळनेर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद जळगाव जि. प. सेस योजना २०१९-२० अंतर्गत कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव तर्फे सण २०१९-२० चा आदर्श शेतकरी पुरस्कार तालुक्यातील आर्डी येथील प्रगतिशील शेतकरी जगतराव दौलतराव पाटील यांना देण्यात आला. गेल्या ४० वर्षा पासून अखंडितपणे शेती व्यवसायात ते कार्यरत असून शेतीत नवनविन प्रयोग करीत यांत्रिकीकरनातून उत्तम शेती व्यवस्थापनाकडे त्यांचा कल असतो.

सदर कार्याची दखल घेत त्यांची आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेला पुरस्कार वितरण कार्यक्रम हा आज अमळनेर पं. स. येथे गटविकास अधिकारी सोनवणे साहेब व माजी सभापती श्याम अहिरे , रेखाताई नाटेश्वर पाटील,प्रवीण पाटील,विनोद जाधव,निवृत्ती बागुल आदी पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत देण्यात आला.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.