जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

0

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील ‘स्वामी विवेकानंद’ पथकातील 4 विद्यार्थ्यांना भारत स्काऊटस ॲण्ड गाईडस् अंतर्गत कब या उपक्रमातील सुवर्ण बाण हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

कब उपक्रमातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सुवर्ण बाण पदक मिळवणारी जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.

शाळेतील इ.5 वीत शिकत असलेले रोहन राजेंद्र भिल, अनुराग सुनिल पाटील, दिग्विजय नितिन पाटील, हिमांशू शरद पाटील यांनी सन 2018-19 मध्ये दोंडाईचा येथे राज्यस्तर चतुर्थ चरण परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सदर विद्यार्थी सुवर्ण बाण या राष्ट्रीय पदकासाठी पात्र ठरणार हे हेरुन शाळेतील कब मास्टर श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची त्यादृष्टीने तयारी करुन त्यांचे सन 2019-20 मध्ये राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार प्रस्ताव जिल्हा संघटक एस.आर.बेलोरकर व हेमा वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यालयामार्फत राष्ट्रीय कार्यालयाकडे पाठवले होते. सदर प्रस्तावांची राष्ट्रीय कार्यालयाकडून छाननी होऊन शाळेतील चारही विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण बाण पुरस्कारासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना स्काऊट च्या जागतिक पातळीवरील सेवाभावी कार्याची ओळख करुन प्राथ.स्तरावरील कब उपक्रमातील नियम, वचन, शिस्त, संचलन, सेवाभाव, राष्ट्रीय व सामाजिक कार्यातील सहभाग, मूल्यशिक्षण, विविध खेळकृती, विविध प्राविण्य पदके इ.बाबत शाळेचे मुख्याध्यापक तथा कब मास्टर श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना कबच्या विविध उपक्रमांसाठी शाळेतील उपशिक्षक श्री.प्रवीण पाटील, श्री.रविंद्र पाटील, श्रीम.वंदना सोनवणे यांचेही मार्गदर्शन लाभले.

राष्ट्रीय कार्यालयाकडून सदर विद्यार्थ्यांचे सुवर्ण पदक प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले असून कोविड परिस्थिती निवळल्यावर लवकरच जिल्हा स्तरावर या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावरुन जळगाव भारत स्काऊट गाईड जिल्हा मुख्य आयुक्त मा.श्री.बी.एस.अकलाडे साहेब, जिल्हा सचिव मा.श्री.बी.व्ही.पवार साहेब, जिल्हा संघटक (स्काऊट) मा.श्री.एस.आर.बेलोरकर सर, जिल्हा संघटक (गाईड) श्रीमती हेमा वानखेडे मॅडम यांनी कब विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.आर.डी.महाजन साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी. धनगर साहेब, केंद्रप्रमुख मा.श्री.गोकुळ पाटील, मा.श्री.चंद्रकांत साळुंके, केंद्र समन्वयक मा.श्री.भगवान पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत पिंगळवाडे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ पिंगळवाडे, अमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.