जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

0

जळगाव ;- कंत्राटी कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडून वारंवार होणारी पिळवणूक, शासनाच्या दुटप्पी धोरणा विरुद्ध जिल्हा परिषदेतील एनआरएचएमचे कंत्राटी कर्मचारीयांनी आज ११ पासून बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हा परिषदेसमोर सुरु केले आहे . जळगाव जिल्ह्यातील ६५० कर्मचारी या अांदाेलनात सहभागी झाले आहेत .

जिल्हा परिषदेसमोर सकाळी १० वाजेपासून कर्मचाऱयांनी निदर्शनाला सुरुवात केली . यावेळी घोषणाबाजी करण्यात आली . या अांदाेलनकाळात कर्मचारी कोणत्याही शासकीय कामात सहभागी होणार नसल्याचे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व अधिकारी-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय शिंदे, सचिव भुषण पाटील, उपाध्यक्ष संजय भावसार यांनी यावेळी सांगितले . या आंदोलनाला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.