जळगाव ;- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत बदल्यांच्या प्रक्रियेला वेग दिला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील ५ हजार शिक्षकांच्या बदल्यांसाठी प्रक्रिया सुरु करण्यात अाली अाहे.
मे महिन्यात मराठी माध्यमाच्या संवर्ग एक व दोनच्या ४४२४ तर उर्दू माध्यमातील ५३५ बदल्या होणार आहेत. यासाठी ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. या नोंदणीची मुदतही बुधवारी रात्री संपणार आहे. एक संवर्गात अपंग, विधवा, परित्यक्त्या घटस्फोटीतांची प्रक्रिया होईल, तर दुसऱ्या संवर्गात पती पत्नी एकत्रीकरणातील बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. बदली प्रक्रियेची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोंदणीनुसार शिक्षकांच्या गावाचे मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून शासनाकडून तारीख आल्यावर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.