जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी निलंबित

0

जळगाव : जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने शिक्षक, शिक्षणसेवक व शिपायांच्या भरतीप्रकरणी जिल्हा परिषदेतील तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा नाशिक महानगरपालिका शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.  पुणे शिक्षण आयुक्तालयाचे शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी या कारवाईचे आदेश काढले आहेत. तीन दिवसांपूर्वी नशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

बनावट शासन आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षकांची पदे भरून ती शिक्षण उपसंचालकांकडून मंजूर करुन घेतल्याप्रकरणी पाचोराचे आमदार किशोर पाटील यांनी यासंबंधी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. याची दखल घेत शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी गेल्या बुधवारी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानुसार उपसंचालक व शिक्षणाधिकारी महाजन यांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली हाेती. त्यानुसार शिक्षणमंत्री यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.