जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावल्या 26 उमेदवारांना नोटिसा

0

जळगाव :- लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना सोशल मीडियावरून जाहिराती “व्हायरल’ करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे अजित तडवी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे रोहिदास अडकमोल यांना, तर जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर, भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील, अपक्ष उमेदवार ईश्वर मोरे, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.