जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतले धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती

0

धरणगाव :  ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा नसल्याने त्यांनी तात्काळ चाळीस सिलेंडर ची वेवस्था करून दिली. त्याचबरोबर अकरा पेशंट यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजनचे आवश्यकता असल्याने त्यांना देखील गोदावरी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था तात्काळ केली त्याचबरोबर दहा समुदाय आरोग्य अधिकारी त्यांचे ड्युटी 24 तास धरणगाव येथील सेंटरला लावण्याचे आदेश दिले त्याचबरोबर औषध साठा संपलेला असताना देखील तातडीने औषध साठा मागवण्यात आला. तसेच कामात दिरंगाई टाळाटाळ केल्यास त्यांनादेखील निलंबित करण्याचे आदेश प्रांत विनय गोसावी यांनी दिले आहेत.

त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित सहाय्यक जिल्हा चिकित्सक डॉक्टर तासखेडकर,डॉक्टर सौ सोनटक्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सोनवणे, ,वैद्यकीय अधिकारी गिरीश चौधरी,डॉक्टर बन्सी, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार नितींकुमार देवरे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघजी, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,शिवसेना गटनेते पप्पू भावे, राहुल रोकडे, लोकमतचे पत्रकार कल्पेश महाजन उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.