जळगाव | प्रतिनिधी
संघर्ष अपंग कल्याण बहुउद्द्ेशिय संस्थेतर्फे नुकतेच जिल्हाधिकारी यांना समितीची सभा घेण्यात यावी, या विषयीचे निवेदन देण्यात आले.
जिल्हा अपंग पुनर्वसन समन्वय समिती गठित होऊन बराच काळ झाला असून दिव्यांगाच्या समस्या सोडविण्याकरिता समिती गठीत झाली आहे. परंतु अद्याप सभा झालेली नाही. दर तिन महिन्याला सभा घेणे आवश्यक असूनही दिव्यांगांच्या समस्या प्रलंबित आहे.दिव्यांगांना कर्ज मिळत नाही, घरकूल योजनेचा लाभ नाही, दिव्यांगांसाठी दरमहा सहाशे रू. फेन्शन(मानधन) मिळते;त्यामध्ये वाढ झालेली असून त्याचा लाभ मिळत नाही, दिव्यांगांना अंत्योदयात समाविष्ट करून 35 किलो धान्यांचा लाभ मिळावा. महापालिकेकडून दिव्यागांसाठी कोणतीही ठोस योजना नाही, व्यक्ती अधिनियम 2016 कायद्याची अंमल बजावणी होत नाही,
यासाठी ही सभा होणे आवश्यक असून सभा त्वरीत घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना समिती अध्यक्ष गणेश पाटील, किशेार नेवे, राजेंद्र वाणी सचिन खैरनार, अरूण पाटील, संतराम एकशिंगे, गोविंद देवरे, जितेंद्र पाटील, आशा पाटील, मनिषा दळवी, संगिता प्रजापत, रविंद्र शिंदे यासह आदी दिव्यांगांनी दिले.