जळगाव:- शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रत्यक्ष रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची पाहणी केली. यावेळी महापालिकचे उपायुक्त सतिष कुळकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

