योगेश पाटील उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून सन्मानित

0

जिल्हाधिकारी राऊत यांनी केला गौरव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बोदवड तालुक्यातील रहिवासी तथा बोदवड तहसील कार्यालयाचे माजी मंडळ अधिकारी व आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळकायदा अव्वल कारकून म्हणून कार्यरत योगेश पाटील यांचा उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी सत्कार केला.

या सत्कार समारंभांनिमित्त प्रवीण महाजन (अपर जिल्हाधिकारी), राहूल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी, रवींद्र भारदे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन), तुकाराम हुलवडे उपजिल्हाधिकारी (निवडणूक),प्रमोद बोरोले (जिल्हा सूचना अधिकारी), शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), प्रसाद मते (प्रांताधिकारी) जळगाव, पंकज लोखंडे तहसीलदार (महसूल), महेंद्र माळी तहसीलदार (कुळकायदा), सुरेश थोरात तहसीलदार (सामान्य प्रशासन), जितेंद्र कुंवर तहसीलदार (संगायो), नामदेव पाटील तहसीलदार जळगाव, अरुण शेवाळे तहसीलदार जामनेर, सुनील समदाणे नायब तहसीलदार उपस्थित होते व त्यांनी योगेश पाटील यांचे अभिनंदन केले.

राज्याच्या गतिमान प्रशासनामध्ये महसूल विभाग सातत्याने अग्रस्थानी आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या काळात महसूल विभाग अहोरात्र काम करीत असतो. तसेच राज्यापासून खेडेगावापर्यंत शासनाची धुरा सांभाळणारा महसूल विभाग शासनाच्या अनेक विभागांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असतो. महसूल सप्ताहात आपल्या जिल्ह्यातुन सर्वाधिक महसूल गोळा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत योगेश पाटील यांच्या सारख्या कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवली आहे, म्हणून त्यांचा उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून सत्कार करण्यात आला.

२०२०-२१ या वर्षात महसूल प्रशासनाला लोकाभिमुख व गतिमान करण्याकरिता तसेच कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे महसूल अव्वल कारकून योगेश पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही योगेश पाटील यांना नाशिक विभागातून मंडळ अधिकारी बोदवड व कुळकायदा अव्वल कारकून या पदावरिल त्यांच्या कार्याबाबत व 7/12 संगणकीकरणाच्या कामकाजाबाबत गौरविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.