Saturday, December 3, 2022

जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात कारवाई

- Advertisement -

वाहन तळावर वाहने न लावता अन्य ठिकाणी दुचाकी पार्कींग 8 ते 10 वाहन धारकांना दंड

- Advertisement -

जळगांव.दि12-
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन तळाची व्यवस्था असून सुद्धा वाहनतळ सोडून अन्य जागी वाहने उभी करणार्‍या वाहनधारंकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात विविध कामांसाठी जिल्ह्या भरातुन अनेक नागरीकांसह अन्य अधिकारी देखिल येत असतात. यात अनेक नागरीक विविध मागण्या, निवेदने आपापले गार्‍हाणे लोकशाही मार्गाने मांडण्यासाठी येत असतात तर अधिकारी वगार्ंंचे प्रशिक्षण बैठका वा अन्य प्रशासकिय कारणास्तव आवागमन सुरू असते. या फाफटपसार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातच अनधिकृत वाळू गौण खनिज वाहतुक करणारी वाहने जप्ती करण्याची कारवाई कलेली वाहने देखिल चाकांची हवा काढलेल्या अवस्थेत उभी आहेत. अशा गर्दीत अनेक दुचाकीधारकच नव्हे तर अधिकारी कर्मचारी वर्गाची वाहने हि वाट मिळेल तेथे बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली असतात. या विदारक परीस्थितीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतुक प्रशासन विभागतर्फे सुमारे 8 ते 10 दुचाकी वाहन धारकांवर 200 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येवून सोडून देण्यात आले. परंतु जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नुकताच 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला आहे. नुतन जिल्हाधिकारी यांच्यासाठी केवळ देखावा नव्याची नवलाई नउ दिवस ठरू नये. अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करण्याच्या कारवाईत सातत्य असावे जेणे करून जिल्हाधिकारी कार्यालय ईमारत, जुने जिल्हा परीषद भवनासह अन्य प्रशासकिय कार्यालये देखिल हेरीटेज म्हणून घोषित आहेत. त्यांचे सौदर्य कायमस्वरूपी चिरकाल टिकावे यासाठी अशा कारवाईत सातत्य रहावे. शहरात अन्य ठिकाणी देखिल बेशिस्त वाहन पार्कीगसह लेन कटींगसह भरधाव वेगाने जाउन सिग्नल तोडणे, बेंडाळे महिला विद्यालय मार्गाने थेट डिएसपी कार्यालयाकडे विरूद्ध दिेशेने अनेक दुचाकी वाहन धारक वाहने घेउन जातात. जुन्या नगरपालिका मोकळ्या मैदानावर दुचाकीसह चारचाकी वाहनतळ व्यवस्था मनपाकडून देण्यात आली असून सुद्धा जुन्या जिल्हा परीषद भवना जवळ देखिल अनधिकृत वाहन तळच दिसून येतो . याकडे देखिल वाहतुक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे नागरीकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या