जिल्याच्या विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संधी द्या

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
डॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून राष्ट्रवादीची जागा असल्या नंतर देखील काँग्रेसलाही जागा रावेरची जागा सोडल्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार मानत रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुन्हा तालुका मुक्ताईनगर येथे आयोजित जाहीर सभेत केले. याप्रसंगी बोलताना म्हणाले की ेल्या पाच वर्षात शेतकरी हवालदिल झाला असून केवळ मराठवाड्यातच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर पाच वर्षांत संपूर्ण राज्यात पंधरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत विकासात अग्रेसर असलेले पूर्वी महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याच्या दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्राच्या जनते वर आला आहे सत्तेचा फायदा भारतीय जनता पक्षाने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता सत्ता मिळवण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाचे केंद्र शासन करत आहे सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य असून राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करुन दोन वर्ष झाली मात्र अद्यापही कुणाला कर्जमाफी मिळालेली नाही केवळ अभ्यास करणारे हे सरकार सर्वच क्षेत्रात नापास झाले असून गेल्या पाच वर्षात दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना भजे करण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे सांगतात हाताला काम नाही शेतीला दाम नाही असं यापूर्वी कधी घडले नाही म्हणून या सरकारला खाली करण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले जनतेच्या मनातच भारतीय जनता पक्षाच्या सत्तेबद्दल राग असून ते दर्शन मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान यात मतदारांनी घडवले आहे बऱ्याच दिवसांनी रावेर लोकसभा मतदार संघात पंजाब हा दिसला असून नवसाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्यायला पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती असून राज्यशासन राज्यातील दुष्काळाबाबत गंभीर नाही साधा मध्यम व गंभीर असे तीन प्रकारचे दुष्काळ राज्यशासन सांगत आहे यापूर्वी अशा प्रकारची विभागणी कधीही झाली नाही दुष्काळ हा दुष्काळ असतो महाराष्ट्र तिला येणाऱ्या या भाजपा सरकारला लाज वाटत नाही काय असे शब्दात त्यांनी घणाघाती आरोप केला. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांच्या बद्दल वाईट शब्द बोलणाऱ्या साधलेला भोपाळ मधून उमेदवारी देणाऱ्या या पक्षाची मानसिकता काय हे लक्षात येते साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केले. यांचा काँग्रेसने कधीही मतांसाठी उपयोग केला नाही मात्र पुलवामा सर्जिकल स्ट्राइक यासारख्या मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्ष चे सरकार हे लाचार वाणी पणाने वागत त्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घेत आहेत.देशात यापुढे भाजपाचे चुकून सरकार जर आले तर देशात हुकुमशाही येईल आणि कधीही मतदान होणार नाही म्हणून ही विचारांची लढाई असून राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी तर शेतकऱ्यांची होणारच आहे पण कर्ज चुकवल्याबद्दल कोणत्याही शेतकऱ्याला पोलीस केस सामोरे जाऊ देणार नाही असा कायदा काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर करणार आहे शेतकऱ्यांच्या गळ्यात लाभार्थी म्हणून पाट्या घालणाऱ्या व आरोपी प्रमाणे त्यांचे फोटो काढणाऱ्या या निर्लज्ज भाजप शासनाला हाकलून लावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.अशोक चव्हाण यांच्या सभेदरम्यान चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या जात होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.