जिप सदस्य प्रतापराव पाटलांच्या पाठपुराव्याने मिळाली आठवडे बाजाराला रुग्णवाहिका

0

जळगाव :- शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ दर बुधवारी भरणार्‍या आठवडे बाजारासाठी महामार्ग ओलांडून यावे लागत असल्याने मोठ्याप्रमाणावर अपघात होत असतात. त्यामुळे त्याठिकाणी दर बुधवारी एक रूग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी युवासेना जळगाव जिल्हाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली होती. शल्यचिकीत्सकांकडे पाठपुरावा केल्याने मागणी तात्काळ मान्य करण्यात येवून रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे युवासेनेतर्फे रूग्ण वाहिकेचे चालक व वैद्यकीय अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

गुजराल पेट्रोल पंपासमोर दर बुधवारी आठवड़े बाजार भरतो.त्यामुळे रहदारी वाढून अपघात होतात व त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. गेल्या बुधवारी अशाच एका अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाले होते. त्यांना जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या खाजगी वाहनातून पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. त्यानंतर युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी व पदाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांची भेट घेऊन दर बुधवारी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत दर बुधवारी एक रूग्णवाहिका व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. बुधवारी रूग्णवाहिकेजवळ जावून डॉक्टर आणि चालकाचा युवासेनेतर्फे सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, समन्वयक जितेंद्र बारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.